News Flash

आईच्या हातून गंभीर चूक, ११ दिवसांचे बाळ ८५ टक्के भाजले

पुण्यातील कोंढवा येथील घटना

बाळाची अवस्था चिंताजनक

पुण्यातील कोंढवा भागात ११ दिवसांचे बाळ शेकोटीत पडून गंभीर भाजल्याची घटना घडली. आईच्या हातून झालेल्या गंभीर चुकीमुळे बाळ रुग्णालयात चिंताजनक अवस्थेत आहे.

अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोंढाव्यातील भाग्योदयनगर येथे मोहम्मद सगीर शेख यांची पत्नी सकाळी साडे अकराच्या सुमारास आपल्या ११ दिवसांच्या बाळाला शेकोटीवर शेक देत होत्या. यादरम्यान त्या बाळाला शेकोटी शेजारी ठेवून काही कामानिमित्त घरामध्ये गेल्या. या अगदी थोडक्या कालावधीत बाळाने शेकोटीच्या बाजूला अंग टाकल्याने बाळ शेकोटीत पडले. या घटनेत बाळ गंभीररित्या भाजले असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:04 pm

Web Title: eleven days burned in pune
Next Stories
1 राज्यघटनेच्या मूल्यांना सुरूंग लावण्याच्या प्रयत्नांची भीती- पृथ्वीराज चव्हाण
2 फग्र्युसन रस्ताही वाहतूक कोंडीचा?
3 क्रांतिवीर चापेकर शिल्पसमूहाची दुर्दशा
Just Now!
X