News Flash

एल्गार परिषद २०२१ : शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु – अरुंधती रॉय

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी परिषदेचं आयोजन केलं आहे.

संग्रहित छायाचित्र

कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत यासाठी मागील दोन महिन्यापासून दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मात्र, हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात अरुंधती रॉय यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर आरोप केला आहे. तसेच आपण या आंदोलनाच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित एल्गार परिषदेत अरुंधती रॉय बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे देखील उपस्थित होते.

अरुंधती रॉय यांनी देशातील अनेक घडामोडींवर यावेळी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, आपल्या येथील पेशवाई गेली पण अद्यापही ब्राह्मणवाद अस्तित्वात असून त्याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राम्हण आणि वैश यांच्या मदतीने देशाचा कारभार चालवत आहेत. येणार्‍या काळात ही व्यवस्था आपल्याला मोडून काढायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टीना आपण बळी पडू नये सर्वानी एकत्रित रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या, “आपल्या देशात ज्यावेळी करोना आजाराचे संकट आले. तेव्हा लाखो नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या. मात्र, अंबानी, अदानी, मित्तल यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये कमालीची वाढ झाली. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्योगपती, प्रसारमाध्यमं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार काम करत आहेत. त्यामुळे मोदींच्या विरोधात कोणीही बोलण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मागील सात वर्षात एकदाही मोदी मीडियाला सामोरे गेलेले नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:57 pm

Web Title: elgar parishad 2021 attempt to defame farmers movement says arundhati roy
Next Stories
1 Coronavirus: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात ७ जणांचा मृत्यू
2 “भाजपाची सत्ता येणार असं फडणवीस म्हणाले की समजून जा…”
3 “अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं आणि…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा
Just Now!
X