News Flash

एल्गार परिषद : शरजील चांगलं बोलला पण….; कोळसे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

एल्गार परिषद यापुढेही कायम राहिल असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ३१ जानेवारी २०२१ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेत हिंदूंबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या परिषदेचे आयोजन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरजीलनं मुद्देसूद भाषण केलं पण त्याने चुकीचा शब्द वापरला, असं कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

“एल्गार परिषदेत बोलताना शरजीलनं ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला त्याचवेळी मी व्यासपीठावरुन ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणून दिली होती. तो चांगला बोलला पण त्यानं चुकीचा शब्द वापरला. एल्गार परिषद यापुढेही घेतली जाईल,” असं कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारची मदत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

आणखी वाचा- “शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून…”, संतापलेल्या फडणवीसांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला अनेक मान्यवरांसह विद्यार्थी नेता शरजील उस्मानीही सहभागी झाला होता. यावेळी शरजील उस्मानी याचं भाषण झालं. या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासही पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शरजील उस्मानी काय म्हणाला, याविषयी बरीच चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा- शरजील उस्मानी एल्गार परिषदेत काय म्हणाला? वाचा संपूर्ण भाषण…

काय म्हणाला होता शरजील?

हिंदुस्तानात हिंदू समाज पूर्णपणे सडला आहे. १४ वर्षांच्या हाफिस जुनैदला चालत्या रेल्वेत एका टोळीने ३१ वेळा चाकूने भोसकून हत्या केली. हे सगळं थांबवायलाही कोणी पुढे आलं नाही. हे लिचिंग आणि हत्या करणारे लोक शांतपणे आपल्या घरी जातात स्वच्छ होतात आणि पुन्हा आपल्यामध्ये येऊन उठतात बसतात, जेवण करतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोणाला तरी पकडतात हत्या करतात आणि पुन्हा सर्वसाधारण जीवन जगतात. आपल्या घरात प्रेमानं वागतात, वडिलांच्या पाया पडतात, मंदिरांमध्ये जाऊन पुजाही करतात, त्यानतंर बाहेर आल्यावर पुन्हा हेच करतात. आजकल लिचिंग करणं हे लोकांनीच सर्वसाधारण बाब करुन ठेवली आहे. मुस्लिमांना मटण, चिकन, बीफ खाण्यावरुन मारलं जातं, ट्रेनमध्ये जागेवरुन मारलं जात, फ्लॅट भाड्याने देऊ नका असं बोललं जात, हा माणसांना मारण्याचा जो प्रकार सुरु आहे त्याला आपण सर्वसाधारण बाब करुन ठेवलं आहे. हिंदुस्तानात आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात, कोणत्याही नेत्याविरोधात किंवा कुठल्याही पक्षाविरोधात नाही तर द्वेषाविरोधात आमची लढाई सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 9:23 am

Web Title: elgar parishad sharjeel spoke well but used wrong word says kolase patil aau 85
Next Stories
1 प्रभागाचे प्रगतिपुस्तक : धनकवडीमध्ये अपुरी स्वच्छतागृहे
2 वीजचोरांवर महावितरणचा बडगा
3 पंडितजींचा महिमा वर्णावा किती..
Just Now!
X