आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठीचे ८ हजार ३७० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सोमवारी मुख्य सभेला सादर के ले. गतिमान वाहतूक, रस्ते विकसन, समाविष्ट गावांसाठी तरतूद, परवडणारी घरे अशा बाबींवर अंदाजपत्रकात लक्ष के ंद्रित करण्यात आले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागालाही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकाची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे-

५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका

पाच टप्प्यांत मेट्रो धावणार

शहराच्या चारही बाजूंना ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात येणार आहे. वनाज -रामवाडी, स्वारगेट-निगडी, शिवाजीनगर-हिंजवडी या तीन मेट्रो मार्गिकांचे काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मार्च महिन्यात मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे. या मार्गावर ऑगस्टपर्यंत मेट्रो धावणार आहे. तसेच या वर्षी डिसेंबर अखेपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणे अपेक्षित आहे. सिंहगड रस्ता-पुणे कॅ न्टोन्मेंट, स्वारगेट-कात्रज, शिवाजीनगर-हडपसर, रामवाडी-वाघोली, वनाज-चांदणी चौक, वारजे-स्वारगेट अशा मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य

डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी, युरो सर्जरी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. सुसज्ज औषध विक्री विभागही सुरू करण्याचे नियोजित आहे. किडनीच्या आजारासंदर्भात निदान आणि अत्याधुनिक उपचारपद्धतीचे केंद्र रुग्णालयात प्रस्तावित आहे. वामेड या संस्थेच्या सहकार्याने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अतिदक्षता विभाग

गंभीर स्वरूपाचे आजार, वाढते साथीचे रोग आणि अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार किं वा शस्त्रक्रिया करण्यासाठी अतिदक्षता विभागातील सुविधांची आवश्यकता असते. यासाठी गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महापालिके च्या पाचही विभागांमधील महापालिके च्या रुग्णालयात अतिदक्षता विभागा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य वर्धन प्रकल्प

आरोग्य वर्धन प्रकल्प ही नवी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. के वळ उपचार न करता आरोग्य सुधारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर कार्य करण्यात येणार आहे. वैद्यकीय व्यवस्थेसाठी प्रशासनाचा वेळ आणि खर्च यामुळे वाचणार आहे. शहरातील दहा लाखाहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नगर रस्त्यावर उड्डाणपूल

पुणे-नगर रस्ता एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार येरवडा-शास्त्रीनगर, विश्रांतवाडी, खराडी, कल्याणीनगर ते कोरेगांव पार्क आदी ठिकाणी उड्डाणपुलांची निर्मिती  करण्याचे नियोजित आहे. यापूर्वीही अंदाजपत्रकात नगर रस्ता उड्डाणपुलासाठी भरीव तरतूद करण्यात आली होती.

खासगी सहभागातून रस्ते विकसन

या वर्षी ११ रस्ते आणि २ पुलांची कामे पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहेत. क्रे डीट नोटच्या बदल्यात रस्ते आणि पूल विकसनाचे नियोजित आहे. यामुळे महापालिके ला थेट गुंतवणूक करावी लागणार नाही. भूसंपादनासाठी एफएसआय, टीडीआर किं वा रिझव्‍‌र्हेशन क्रे डिट बॉँण्ड या पर्यायांचा वापर करण्यात येणार आहे. पुणे-नगर रस्ता आणि नॉर्थ मेन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा पूल डीपी रस्ता या पद्धतीने विकसित होणार आहे. रस्ते विकसनासाठी १४१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ं

पादचाऱ्यांसाठी सिग्नल

पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी शहराच्या विविध चौकांमध्ये आवश्यक तेनुसार पादचाऱ्यांसाठी काउंट डाऊन टायमर असणारे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. या प्रकारचे सिग्नल बसविण्यासाठी अंदाजपत्रकात १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्वारगेट-कात्रज, नगर रस्ता बीआरटी

स्वारगेट-कात्रज दरम्यानच्या ५.५० किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नगर रस्त्यावरील १६ किलोमीटर लांबीची बीआरटी योजना कार्यान्वित झाली आहे. पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रिज या ५.७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी पाटील इस्टेट ते रेंजहिल्स चौक या २ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पूल दरम्यान ६.५० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावापैकी विद्यापीठ चौक ते औंध या ३.२ किलोमीटर लांबीचे रस्ता रुंदीकरणाला गती देण्यात येणार आहे. रेंजहिल्स चौक ते खडकी रेल्वे स्थानक या २.२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रस्तावित आहे. गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, पाटील इस्टेट-संगमवाडी या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. तर एचसीएमटीआरसाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतूद

शिवणे-खराडी रस्ता

शिवणे-खराडी या १८ किलोमीटर लांबीच्या नदीकाठालगतच्या रस्त्यासाठी २८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवणे-म्हात्रे पूल या टप्प्यातील ६ किलोमीटर आणि संगमवाडी-खराडी या टप्प्यातील ११ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मुंढवा पूल ते खराडी दरम्यानची नवीन रस्त्याची मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.

सक्षम सार्वजनिक वाहतूक

या वर्षांअखेरीस पीएमपीच्या ताफ्यात ३ हजार २८१ गाडय़ा असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. बारा मीटर लांबीच्या बीआरटी वातानुकू लित ३५० ई-बस, फे म योजनेअंतर्गत १५० गाडय़ा, पहिल्या टप्प्यात ५० मिडी आणि दुसऱ्या टप्यात ३०० मिडी गाडय़ांची खरेदी नियोजित आहे.

मुळशीसाठी डीपीआर

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. मुळशी धरणातून भविष्यकाळातील पाण्याची

वाढती गरज लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे मुळशी धरणातून

शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सविस्तर प्रकल्प

अहवाल तयार करण्यात

येणार आहे.

समान, शुद्ध पाणीपुरवठा

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात ८२ साठवणूक टाक्यांची  बांधणी, १ हजार ८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आणि ३ लाख १५ हजार जलमापक बसविण्यात येणार आहेत. मार्च २०२१ पर्यंत ५० टाक्यांची उभारणी, ३०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यां टाकणे आणि ४० हजार जलमापक बसविण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता

राजस सोसायटी ते कोंढवा-खडी मशीन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि ८४ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन टीडीआर, एफएसाय द्वारे देण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी ७५ टक्के  जागा तडजोडीने ताब्यात घेण्यात आली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

बालभारती-पौड रस्ता

विकास आराखडय़ात दोन किलोमीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा बालभारती-पौड रस्ता दर्शविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. रस्त्याला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सूचनांनुसार विकसनाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नदीकाठ सौंदर्यीकरण

सांडपाण्यावर प्रक्रिया

‘एक शहर एक प्रवर्तक’ या संकल्पनेनुसार शहरात ११ ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. ११३ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाविष्ट गावांमध्येही सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात येणार आहेत. यंदा १२० किलोमीटर लांबीच्या वाहिन्या बदलण्यात येणार आहेत.

मुळा-मुठा नदीकाठ विकसन

गुजरातमथील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. मुळा-मुठेची वहन क्षमता वाढविणे आणि पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविणे हा योजनेचा उद्देश आहे. नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून वृक्ष लागवड के ली जाणार आहे. त्यासाठी १०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

खासगी सहभागातून पुनर्विकास

महात्मा फु ले मंडई, तुळशीबाग, सारसबाग आणि पंडित नेहरू स्टेडियम परिसराचा एकत्रित पुनर्विकास, मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाचा पुनर्विकास, के . के . मार्के टचा पुनर्विकास करण्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली असून काही पुनर्विकासाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत.

घनकचरा व्यवस्थापन

रामटेकडी-हडपसर येथे ७५० मेट्रिक टन प्रकल्पातून १३.५ मेगॉवॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वर्षांखेरीस उरूळी कचरा भूमीतील १० एकर जागेवर शास्त्रोक्त भू-भराव टाकण्यात येणार आहे. हडपसर-रामटेकडी येथे २ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे विचाराधीन आहे. सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता आऊटसोर्सिग पद्धतीने करण्यात येणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभारण्यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.