अतिक्रमणे होण्यास सुरुवात

पुणे : शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी महापालिके ने के लेला खर्च उधळपट्टी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत शहरातील सहा रस्त्यांवर पादचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी पदपथ विकसित करण्यात येत असले तरी या पदपथांवर अतिक्रमणे होण्यास सुरुवात झाली आहे. वारज्यातील रस्त्यावर तर खुल्या व्यायामशाळेचे साहित्य पदपथावरच बसविण्यात आले आहे. त्यामुळे पदपथ विकसनासाठी के लेला खर्च वाया गेला असून पादचाऱ्यांना विनाअडथळा पदपथ उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते पादचाऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी आणि या रस्त्यावरून त्यांना विना अडथळा चालता यावे यासाठी पदपथ प्रशस्त करण्याची भूमिका महापालिके ने घेतली आहे. त्याअंतर्गत जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्त्यासह मध्यवर्ती भागातील रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्त्यावरील कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय सहा ठिकाणी पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत पदपथांचे विकसन करण्याची प्रक्रिया महापालिके ने सुरू के ली आहे.

कर्वे रस्त्यावरील पौड फाटा ते वारजे या दरम्यानचा रस्ता, पाषाण सूस रस्ता, बिबवेवाडी येथील महेश सोसायटी ते व्हीआयटी वसतीगृह दरम्यानचा रस्ता, पूरम चौक ते मित्रमंडळ चौक दरम्यानचा विकास आराखडय़ातील रस्त्याची कामे महापालिके कडून सुरू झाली आहेत. त्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकामध्येही पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत पदपथ विकसित करण्याचे धोरण महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी जाहीर के ले आहे. मात्र के वळ अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे म्हणून रस्त्यांवर पदपथ विकसित करून प्रमुख वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी अरूंद के ले जाणार आहेत. ही परिस्थिती असताना आता पदपथ विकसनावर के लेला खर्चही उधळपट्टीच ठरत असल्याचे दिसून येत आहे.

कर्वे रस्त्यावरील पौड रस्ता ते वारजे या दरम्यान महापालिके ने पदपथ विकसनाची काही कामे के ली आहेत. निधीअभावी ही कामे रखडली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिके च्या पथ विभागाकडून पदपथ विकसित के लेल्या ठिकाणी खुल्या व्यायामशाळेचे साहित्य पदपथावरच बसविण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कु ठून, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पदपथ विकसनासाठी के लेला खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. महापालिका पादचाऱ्यांसाठी पदपथ प्रशस्त करणार असली तरी त्याचा गैरवापर होत असून पादचाऱ्यांना विना अडथळा चालणेही दुरापास्त ठरत आहे.

रस्ते अरुंद होण्याची भीती

पथ विभागाने जंगली महाराज रस्ता पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत विकसित के ला. पादचाऱ्यांना सुविधा देण्याच्या नावाखाली पदपथ प्रशस्त आणि मोठे करण्यात आले. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथांवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाल्याची वस्तुस्थिती आहे. पदपथ मोठे करताना मूळ रस्ता वाहतुकीसाठी काही प्रमाणात अरुंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होऊ शकली नाही. आता नव्याने सहा रस्त्यांवरही हेच धोरण अवलंबले जाणार आहे. जागेनुसार पादचाऱ्यांसाठी पदपथ विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मूळ रस्तेही वाहतुकीसाठी अरुंद होण्याची शक्यता आहे.