News Flash

पुण्यात अभियंता तरुणीची आत्महत्या, प्रेमसंबंधातून जीवन संपवले?

ही तरुणी बंगळुरु येथे कामाला होती.

प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा संशय

पुण्यातील कोंढवा येथे अभियंता तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जुही नितीन गांधी असं तरुणीचे नाव आहे. कोंढव्यातील सुमा सिलव्हर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणीने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही तरुणी बंगळुरु येथे कामाला होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील शांतीनगर भागात राहणारी जुही नितीन गांधी वय २३ ही बंगळुरु येथील एका आयटी कंपनीमध्ये कामाला होती. तर ती मागील तीन दिवसापूर्वी बंगळुरु येथून पुण्यात आई वडिलांकडे आली होती. मंगळवारी रात्री  जुही त्याच परिसरात म्हणजे  सिल्वरलाईन या सोसायटीमध्ये राहणाऱ्या  तीन मित्रांना  भेटण्यास गेली होती. या तिघांमध्ये  तिचा एक प्रियकर होता. त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्यावर तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:40 pm

Web Title: engineer young girl commited suside love relationship pune
Next Stories
1 पाऊस आला छोटा, विजेचा खेळखंडोबा मोठा!
2 ३६ किलोमीटरच्या रिंग रोडसाठी ‘टोल’चा पर्याय?
3 पिंपरी भाजपमधील ‘स्वीकृत’चा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
Just Now!
X