News Flash

खर्च कमी करण्यासाठी सारे काही ऑनलाइन!

करोना विषाणू संसर्गात लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशिक्षणे, परिषदा, बैठकांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय

चिन्मय पाटणकर, लोकसत्ता

पुणे : टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे राज्य शासनाकडून खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रशिक्षणे, परिषदा, बैठका अशा उपक्रमांवरील खर्च टाळण्यासाठी येत्या वर्षभरात शिक्षण विभागाकडून असे उपक्रम ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना विषाणू संसर्गात लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासकीय सेवेतील नवीन पदभरती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. खर्चात कपात करण्याच्या धोरणाचा परिणाम शिक्षण विभागावर होणार आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहेत.

पुढील वर्षभरातील ऑनलाइन माध्यमांच्या वापराविषयी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी लोकसत्ताला माहिती दिली. ‘वित्त विभागाकडून खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या योजनांपैकी दोन तृतीयांश योजनांचा निधी कमी होणार आहे. त्यामुळे खर्च कमीत कमी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात शिक्षकांची प्रशिक्षणे, परिषदा आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. राज्यभरातून शिक्षकांनी प्रशिक्षण, परिषदांना हजेरी लावल्यास त्यांना दैनंदिन भत्ता, प्रवास भत्ताही देता येणार नाही. मात्र हे कार्यक्रम घेणेही आवश्यक असल्याने सहज, सोप्या पर्यायांचा वापर करण्याची गरज आहे. प्रशिक्षणे, परिषदा, अधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे पुढील वर्षभर याच पद्धतीने काम के ले जाईल,’ असे सोळंकी यांनी सांगितले.

तंत्रज्ञान शिकू न घेण्याची सूचना

येत्या वर्षभरात विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. मात्र, काही शिक्षकांना संगणक किं वा वेगवेगळी अ‍ॅप वापरता येत नाहीत. त्यामुळे टाळेबंदीतील सुटीचा सकारात्मक उपयोग करून संबंधित शिक्षकांनी तंत्रज्ञान शिकू न घेऊन त्याचा वापर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:05 am

Web Title: everything online to reduce costs zws 70
Next Stories
1 मद्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी एक हजार ई-टोकन
2 चारशे उद्योग सुरू मात्र कामगारांची उणीव
3 पुस्तकप्रेमींना आता पुन्हा वाचनानंद..
Just Now!
X