विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ही तपासणी करण्यात आली. पुण्यात जी यंत्रे तपासणीसाठी आणण्यात आली होती, ती उत्तर प्रदेशातून आलेली असल्यामुळे या यंत्रांना काँग्रेसने हरकत घेतली असून तसे पत्र राज्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणण्यात आली असून मतदान यंत्र तपासणीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाने बोलावले होते. काँग्रेसतर्फे ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर आणि राजेंद्र भुतडा यांना या तपासणीसाठी पक्षातर्फे पाठवण्यात आले होते. या तपासणी दरम्यान जी यंत्र दाखवण्यात आली, ती उत्तर प्रदेशातून आलेली असल्याचे दिसले तसेच ती लोकसभा निवडणुकीत वापरल्याचेही दिसून आले. निवडणुकीनंतर सहा महिने ही यंत्र वापली जात नाहीत. त्यामुळे काँग्रेसने या यंत्रांना हरकत घेतली. तशी माहिती आडेकर आणि भुतडा यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांना दिली.
शहराध्यक्ष छाजेड यांनी निवडणूक आयुक्तांना यंत्रांबाबत हरकत असल्याचे पत्र दिले असून निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत मतदान यंत्र वापरली जात नाहीत, असे या हरकतीत नमूद करण्यात आले आहे.

Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या