हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात फिर्यादीनंच आपल्याला मारहाण केली असल्याचा दावा केला. तसंच आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय असल्याचाही आरोप केला.

हर्षवर्धन जाधव न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हणाले की, “आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो होतो, तेव्हा फिर्यादीने दोघांचे अपहरण आणि मारहाण केली”. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही केला. याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असं सांगत यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी केला.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या महिला सहकाऱ्यांचा विनयभंग करण्यात आल्याचं त्यांचे वकील झहीर खान पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. “औंधला जात असताना कारसमोर दुचाकी लावून अडवण्यात आलं. यानंतर हर्षवर्धन आणि त्यांच्या महिला सहकाऱ्या कारमध्ये बसवण्यात आलं. फिर्यादी अमन चड्डा, त्याचा भाऊ तुषार चढ्ढा आणि नगरसेवक मनिष आनंद यांनी दोघांना बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंगही केला. हा प्रकार निर्भया प्रकरणापेक्षा कमी नाही”.

रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक

“औरंगाबादमधील कौटुंबिक न्यायालयात हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नीतील वाद सुरु आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास दानवे जबाबदार असतील असं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. दोन प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागला. असं काही तरी होईल याची आम्हाला कल्पना होती,” असंही यावेळी झहीर खान पठाण म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं गेलं.