अनेक भागात विविध कारणांसाठी रस्ते खोदाई

पुणे : खासगी मोबाइल कंपन्या आणि शासकीय संस्थांबरोबरच नगरसेवकांची प्रभागस्तरीय कामे आणि महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाकडील कामे सुरू झाल्यामुळे शहरात सर्वत्र रस्ते खोदाईला वेग आला आहे. शहराच्या बहुतांश भागात विविध कारणांसाठी रस्ते खोदाई सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, रस्ते खोदाईची कामे पूर्ण झाल्यानंतरच ते पूर्ववत करण्यात येणार आहेत. मात्र सालाबादप्रमाणे रस्ते खोदाईची कामे पावसाळा सुरू झाला तरी होत असल्यामुळे रस्ते पूर्ववत होणार का, हा प्रश्न निर्माण झाला असून शहर खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे.

दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत विविध मोबाइल कं पन्या, महावितरण, महाराष्ट्र नैसर्गिक वायू महामंडळ, बीएसएनएल या शासकीय कं पन्यांकडून रस्ते खोदाईचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखले के ले जातात. महापालिके कडून या प्रस्तावांना ठरावीक शुल्क आकारून मान्यता दिली जाते. सध्या मोबाइल कं पन्यांनी १५० किलोमीटर लांबीच्या अंतराची खोदाई करण्याचे प्रस्ताव सादर के ले आहेत. त्याला महापालिके च्या पथ विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे रस्ते खोदाईची प्रक्रियाही ठप्प झाली होती. यंदा मात्र पहिल्या टप्प्यातच मोबाइल कं पन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव सादर के ले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मार्च महिन्याअखेरपासून शहरात रस्ते खोदाईला सुरुवात झाली आहे.

चालू आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यातच मार्च महिन्यातही नगरसेवकांनी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथांची दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी अशा कामांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. महापालिके च्या स्थायी समितीनेही या प्रकारच्या शेकडो कामांना मान्यता दिली असून नव्याने प्रस्तावही दाखल झाले आहेत. ही सर्व कामे नगरसेवकांना अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या निधीतून सुरू झाली आहेत. याशिवाय पथ विभाग, मलनिस्सारण विभागानेही त्यांची पावसाळापूर्व कामे सुरू के ली आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्त्यांवर खोदाई सुरू झाल्याचे चित्र आहे. भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी वारेमाप रस्ते खोदाई होत असल्यामुळे मुख्य रस्त्यांचा अर्धा भाग खोदला गेला आहे. महापालिके च्या महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गतही कामे प्रगतिपथावर असून त्यासाठीही रस्ते खोदाई मोठ्या प्रमाणावर होत आहे.

रस्ते खोदाईची कामे झाल्यानंतर रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे काम महापालिके कडून के ले जाते. त्यासाठी रस्ते खोदाईच्या प्रस्तावांना मान्यता देताना संबंधित यंत्रणांकडून ठरावीक शुल्क आकारले जाते. यंदा मात्र खोदाईची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाही खोदाईची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच रस्ते पूर्ववत करण्याची भूमिका महापालिके च्या पथ विभागाने स्वीकारली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रस्ते खोदलेल्या अवस्थेतच राहणार असून रस्त्यावरील राडारोडा तसाच पडून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्ते खोदाईची कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरू राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. महापालिके ने एकदमच सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यामुळे पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टप्प्याटप्प्यात रस्ते दुरुस्तीची कामे के ल्यानंतर पावसाळ्यात रस्ते खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात ३० एप्रिल नंतर रस्ते खोदाईला मान्यता देण्यात येणार नाही. मे महिन्यात सर्व रस्ते पूर्ववत के ले जातील. – व्ही. जी. कु लकर्णी, पथ विभाग प्रमुख