News Flash

चित्रकार भाटे यांचे ‘सुभाष जलरंग’ चित्रप्रदर्शन उद्यापासून

जलरंगातील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून त्या बरोबरच चारकोल, अॅक्रेलिक या माध्यमातील चित्रेही प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

चित्रकार सुभाष भाटे यांच्या चित्रांचे ‘सुभाष जलरंग’ हे प्रदर्शन सोमवार (२१ डिसेंबर) पासून आयोजित करण्यात आले असून घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा कलादालनात शुक्रवार (२५ डिसेंबर) पर्यंत हे प्रदर्शन चित्ररसिकांना पाहता येईल.
चित्रकार सुभाष भाटे हे मूळचे पुण्यातील असून अनेक वर्षे मर्चंट नेव्ही आणि कोलकाता येथे पोर्ट ट्रस्ट सेवेत होते. त्यांची जलरंगातील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून त्या बरोबरच चारकोल, अॅक्रेलिक या माध्यमातील चित्रेही प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. घोले रस्त्यावरील कला दालनात सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसात या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता लेफ्टनंट जन. (निवृत्त) विनायक पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे. जलरंगातील निसर्गचित्र तसेच व्यक्तिचित्र आदी बावन्न चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे भाटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 3:10 am

Web Title: exhibition of artist bhate
Next Stories
1 वर्तमानपत्राच्या बदलत्या स्वरूपामध्ये माझ्यासारखे वाचक ‘आऊटडेटेड’!
2 डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यास धमकी
3 टाटा मोटर्सची नवी ‘झिका’ मोटार नव्या वर्षांत बाजारात
Just Now!
X