आकर्षक आणि दुर्मिळ मासे पाहायचे असतील तर लांब जाण्याची गरज नाही, कारण पुण्यात म्हात्रे पुलाजवळील हार्वेस्ट क्लब शेजारी मंगळवारपासून (१२ नोव्हेंबर) ‘अ‍ॅक्वा लाइफ २०१३’ हे प्रदर्शन भरणार आहेत. ते १९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्रौ ९ पर्यंत सुरू राहणार आहे.
हे प्रदर्शन मत्स्यजीव अभ्यासक व सर्वसामान्यांचेसुद्धा आकर्षण ठरणार आहे. या प्रदर्शनात जेली, पॉन्ड्स, बायोटोप्स, अ‍ॅक्रिलीक टँक फिश अशा २०० हून अधिक दुर्मिळ मत्स्यजाती पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये साधारण १३० अ‍ॅक्वा टँक प्रदर्शित होणार असून त्यात माशांच्या वैविध्यपूर्ण जातींचा समावेश असणार आहे. विविध वनस्पती, झाडे अशा एकूण शंभर प्रजातींची माहिती देण्याची सोयही या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्राणी, वनस्पतींप्रति जिव्हाळा व जागरूकता यावी, यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, असे लौकिक क्रिएशन्सच्या लौकिक सोमण यांनी सांगितले.