रंगरेषांच्या मदतीने कॅनव्हासवर अप्रतिम चित्र चितारणारे कलाकार ही प्रसिद्ध 26Murli-Lahoti1चित्रकार मुरली लाहोटी यांची ओळख. कलाछाया संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘देदीप्यमान’ या लाहोटी यांच्या चित्रांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचा गुरुवारी प्रारंभ झाला. लाहोटी यांच्या कारकीर्दीतील हे दीडशेवे एकल चित्रप्रदर्शन आहे.
प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनतर्फे मुरली लाहोटी यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हे औचित्य साधून कलाछाया संस्थेतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारनगर रस्त्यावरील दर्पण कलादालन येथे ३१ मार्चपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात कलाप्रेमी रसिकांसाठी प्रदर्शन खुले राहणार आहे. या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवार (२८ मार्च) आणि सोमवार (३० मार्च) मुरली लाहोटी हे सायंकाळी पाच वाजता चित्र चितारण्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
मुरली लाहोटी या चित्रकारास विद्यार्थिदशेतच पाच राज्य पुरस्कार मिळाले होते. तर, चित्रकार म्हणून अखिल भारतीय स्तरावरील सात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ललित कलातर्फे राष्ट्रीय पुरस्कार लाभले असून, महाराष्ट्र सरकारने त्यांचा प्रथितयश चित्रकार म्हणून गौरव केला आहे. लाहोटी यांनी आपली १०१ चित्रे विविध उपक्रमांकरिता निधिसंकलन करण्यासाठी दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासासाठी त्यांनी जगभरातील विविध देशांना भेटी दिल्या आहेत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान