News Flash

प्रदर्शन… फक्त मोरांच्या चित्रांचे

या प्रदर्शनात केवळ मोरांच्या रेखाटलेल्या व रंगविलेल्या विविध अदा पाहण्याची संधी मिळणार आहे. चित्रकार संदीप यादव यांनी ही चित्रे काढली आहेत.

| December 3, 2013 02:39 am

गोखलेनगरजवळील दर्पण कलादालनात एक अनोखे चित्रप्रदर्शन भरत आहे, विषय आहे मोर. या प्रदर्शनात केवळ मोरांच्या रेखाटलेल्या व रंगविलेल्या विविध अदा पाहण्याची संधी मिळणार आहे. चित्रकार संदीप यादव यांनी ही चित्रे काढली आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या हस्ते बुधवारी (४ डिसेंबर) होईल. ते १० डिसेंबपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. यादव यांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे भाव, त्याची सुरेख रंगसंगती, त्याच्या हालचाली, तुरा, पिसारा आदी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनामध्ये अॅक्रॅलिक, वॉटर कलर आणि सॉफ्ट पेस्टल रंगांनी काढलेली ४० चित्रे पाहायला मिळणार आहेत. ‘पर्यावरणाचे संवर्धन आणि निसर्गात मोरासारख्या सुंदर पक्ष्याचे असणारे अढळ स्थान अन् त्यांची कमी होणारी संख्या याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरवित आहे,’ असे यादव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:39 am

Web Title: exhibition of peacock only
टॅग : Exhibition
Next Stories
1 ‘तन्वीर सन्मान’ गो. पु. देशपांडे यांना जाहीर
2 ‘अमूल’प्रमाणे राज्यातील दुग्धव्यवसाय एका छताखाली कधी येणार? – दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण
3 राज्यातील प्रयोगशील शिक्षकांची माहिती ‘क्लिकवर’
Just Now!
X