हरणांच्या जगभरात आढळणाऱ्या विविध जाती, त्यांची वैशिष्टय़े, त्यांच्यावरील साहित्य यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून २३ ते २५ ऑक्टोबरला हे प्रदर्शन होणार आहे.
हरणाच्या जगभरात १८० प्रजाती आहेत, तर त्यातील जवळपास दहा प्रजाती या भारतातील आहेत. जगातील अनेक प्रजाती या दुर्मीळ म्हणून नोंद करण्यात आल्या आहेत. हरणांच्या विविध जगभरातील विविध प्रजाती, त्यांची वैशिष्टय़े यांचे ‘प्लॅनेट ऑफ डिअर्स’ हे प्रदर्शन भरणार आहे. हरणाचे विविध भाषेतील साहित्यातील उल्लेख, धार्मिक संदर्भ, हरणांवरील विविध देशातील तिकिटे, नोटा, नाणी, सैन्याची चिन्हे आणि विविध प्रजातींच्या हरणांची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. कोल्हापूर येथील हरणांचे अभ्यासक आनंद राजेशिर्के यांचा संग्रह या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. बालगंधर्व कलादालन येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रदर्शन होणार असून सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येणार आहे.