28 September 2020

News Flash

गुरु-शिष्यांच्या चित्रांचे प्रदर्शन

‘अॅलीजियन्स टु ब्युटी’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांना गुरुवारपासून (३ डिसेंबर) पाहता येणार आहेत.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्यासह राहुल देशपांडे आणि गोपाळ नांदुरकर या शिष्यांनी चितारलेली चित्रे ‘अॅलीजियन्स टु ब्युटी’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांना गुरुवारपासून (३ डिसेंबर) पाहता येणार आहेत.
निसर्गदृश्य आणि मानवी जीवनातील चित्रविषय, सुसंवादी वास्तवदर्शी शैलीतून ही चित्रे साकारली गेली आहेत. अमूर्तभाव व्यक्त करणारी ही चित्रे रसिकांना अनोख्या दृश्यसौंदर्याचा अनुभव देणारी आहेत. तैलरंग, अॅक्रॅलिक, पेस्टल कलर, पेन अँड इंक अशा विविध माध्यमांची वैशिष्टय़पूर्ण हाताळणी या चित्रांतून कलाप्रेमी रसिकांना अनुभवता येणार आहे. मॉडेल कॉलनी पोस्ट कार्यालयासमोरील द रवी परांजपे स्टुडिओ येथे १५ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 3:18 am

Web Title: exhibition ravi paranjape picture
टॅग Exhibition
Next Stories
1 पिंपरीतील रस्त्याच्या कडेला सुटलेले त्रिकोणाकृती क्षेत्र आरक्षणातून वगळले
2 यशवंतराव चव्हाण रुग्णालय :नगरसेवक-अधिकाऱ्यांची खाऊगल्ली
3 बुडती बालचित्रवाणी आणखी खोलात
Just Now!
X