15 November 2019

News Flash

वाघोली रस्त्याचे विस्तारीकरण सुरू

वाघोलीमधील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

वाघोलीमधील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, आमदार बाबुराव पाचर्णे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव आणि नगररस्ता वाहतूक कृती समितीचे सदस्य या वेळी उपस्थित होते.

वाघेश्वर, आव्हाळवाडी, केसनंद गावांतील मुख्य चौकाचा रस्ता रूंद

वाघोलीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ या वाघेश्वर, आव्हाळवाडी, केसनंद या तीन गावांचा एकत्र येण्याचा मुख्य चौकाचा रस्ता रूंद करण्यात येणार आहे. हा रस्ता तेराशे मीटर करण्यात येणार आहे.

वाघोलीमधील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, आमदार बाबुराव पाचर्णे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव, नगररस्ता वाहतूक कृती समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.

वाघोलीच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून प्राधान्याने विकासकामे होत आहेत. वाघोलीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या भागातील रस्ते रूंद करणे गरजेचे आहे. पीएमआरडीएकडून वाघोली पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सेवा आदी प्रकल्प सुरू केले आहेत. वाघोलीतील रस्ते रुंद करण्यासाठी अतिक्रमण मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे, असे पालकमंत्री बापट यांनी या वेळी सांगितले.

वाघोलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. त्यामुळे वाघोलीमधील महत्त्वाच्या चौकांचा अभ्यास करून रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करून स्मार्ट सिग्नल यंत्रणा या भागात राबविली जाणार आहे. वाघोलीच्या या हाती घेतलेल्या रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण केले जाईल.

वाघोली बाह्य़वळण रस्त्याचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. वाघोलीत पाणी पुरवठा योजनेचे नियोजन असून विकासकामे मार्गी लागण्यासाठी या ठिकाणी पीएमआरडीएकडून लवकरच कार्यालय सुरू केले जाईल.

– किरण गित्ते, आयुक्त पीएमआरडीए

First Published on September 12, 2018 4:15 am

Web Title: expansion of the wagholi road