News Flash

अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ

आता विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

 

पुराज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशांसाठी शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या आणि एक प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात आली आहे. तर प्रवेशांपासून वंचित विद्यार्थ्यांसाठी दुसरी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फे री राबवण्यात येत आहे. या

फेरीअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. मात्र ही मुदत वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

प्रवेशासाठीची ही शेवटची संधी असल्याचे माध्यमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:34 am

Web Title: extension for eleventh admission abn 97
Next Stories
1 डॉ. राणी बंग यांचा ‘लॅन्सेट’कडून सन्मान
2 पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश
3 धार्मिक आणि धर्मादाय न्यासांसाठी स्वतंत्र कायद्यांची आवश्यकता!
Just Now!
X