07 August 2020

News Flash

‘महावितरण’चे पुणे विभागात पाच हजार ‘फेसबुक फ्रेण्ड्स’!

कंपनीच्या पुणे विभागाने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या फेसबुकला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून पुणे विभागात पाच हजार मित्र महावितरण कंपनीने जोडले आहेत.

| August 9, 2014 03:20 am

महावितरण कंपनीवर नेहमीच तक्रारींचा भडिमार केला जातो.. वीज गेली की ग्राहक संतप्त होतात.. नागरिकांशी थेट संबंध येत असल्याने वीज वितरणाच्या व्यवस्थेविषयी सहसा कोणी फारसे चांगले बोलत नाही.. मात्र याच ‘महावितरण’चे मित्रही होऊ शकतात, हेही सत्य आहे. कंपनीच्या पुणे विभागाने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या फेसबुकला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून पुणे विभागात पाच हजार मित्र महावितरण कंपनीने जोडले आहेत.
महावितरण कंपनीच्या जनसंपर्क विभागाने प्रत्येक परिमंडलाच्या माध्यमातून फेसबुकद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्याच्या सूचना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) राम दोतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह सर्वच १४ परिमंडलात फेसबुकद्वारे ग्राहकांशी थेट संवादाला सुरुवात झाली. पुणे परिमंडलाच्या वतीने ‘महावितरण पुणे’ हे फेसबुक अकाउंट सुरू करण्यात आले. मात्र, काही कालावधीतच या अकाउंटवरील पाच हजार मित्रांची मर्यादा संपली. त्यामुळे ‘महाडिसकॉम पुणे’ या नावाने नवे अकाउंट सुरू करण्यात आले आहे. या अकाउंटलाही मागील दोन ते तीन दिवसांत तीनशेहून अधिक ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे.
महावितरण कंपनीच्या या दोन्ही फेसबुक अकाउंटवर महावितरण कंपनीशी संबंधित घडामोडींच्या माहितीपर व विकासात्मक बातम्या, विविध योजनांची माहिती, अजय मेहता यांचे ‘विद्युत वार्ता’ मधील ‘हितगूज’, इंटरनेट व मोबाइलद्वारे वीजबिल भरणा, ई-मेलद्वारे ई-बिल सेवा, प्रीपेड मीटर आदी ग्राहकोपयोगी सेवांची माहिती, विजेची निर्मिती ते वितरण त्याचप्रमाणे वीजसुरक्षा उपाययोजनांबाबतची माहिती देण्यात येत आहे. त्यास मित्रांच्या माध्यमातून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. ही माहिती ‘लाइक’ किंवा ‘शेअर’ होत असल्याने महावितरणच्या फेसबुकवरील फ्रेण्ड्स ऑफ फ्रेण्ड्सच्या अकाउंटवरही ही माहिती प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2014 3:20 am

Web Title: facebook mahavitaran friends
टॅग Facebook,Mahavitaran
Next Stories
1 भूतदया लघुपटात आणि प्रत्यक्षातही
2 डॉ. सुरेश पाटणकर यांच्या आयुर्वेदिक औषधाला अमेरिकेचे पेटंट
3 पुणे मेट्रोबाबत र्सवकष विचार झालेला नाही- चौधरी
Just Now!
X