News Flash

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा देण्याची अंध विद्यार्थ्यांनाही सुविधा

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या ६७६ अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ऑनलाइन परीक्षा प्रणालीत टेक्स्ट टू ऑडिओ तंत्रज्ञान समाविष्ट

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आता अंध विद्यार्थ्यांनाही देता येणार आहेत. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सुविधा निर्माण के ली असून, अंध विद्यार्थ्यांना टेक्स्ट टू ऑडियो तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा देता येणार आहेत.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या ६७६ अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी आहे. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक घेणे किंवा वीस मिनिटे अधिकचा वेळ असे दोन पर्याय विद्यापीठाकडून दिले जातात. मात्र करोना काळात लेखनिक नको, आम्ही अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देऊ इच्छितो असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला. त्यातून अ‍ॅक्सेसेबिलिटीचा विषय पुढे आला. ऑनलाइन परीक्षेसाठीच्या प्रणालीमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटीनुसार बदल करणे हे मोठे काम होते. मात्र परीक्षा घेण्याचे काम विद्यापीठाच्याच एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनकडे असल्याने अ‍ॅक्सेसेबिलिटीसाठीचे आवश्यक बदल करून ऑनलाइन प्रश्नपत्रिकेत प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय श्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर आणण्यात आले. स्वत: परीक्षा देण्यासाठी विनंती केलेल्या विद्यार्थ्यांपैकी आयएलएस विधी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या युवराज झांझडे या विद्याथ्र्याची प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा यशस्वी रीत्या पूर्ण झाली आणि त्याचा निकालही व्यवस्थितपणे तयार झाला. त्यामुळे एक मोठी कामगिरी विद्यापीठाने साध्य केली आहे.

स्वत:ला परीक्षा देता आल्याबद्दल विद्याथ्र्याने लघुसंदेश पाठवून आनंद व्यक्त केला, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. अंध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सुविधा निर्माण करून देताना परीक्षेची गोपनीयता आणि गुणवत्ता राखली आहे. आता या पद्धतीने अन्य अंध विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येईल, असे डॉ. काकडे यांनी नमूद केले.

‘करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा देण्यात बऱ्याच अडचणी होत्या. आता विद्यापीठाची परीक्षाप्रणाली सहायक झाल्यामुळे अंध विद्यार्थी स्वयंपूर्ण झाले आहेत.

ही सुविधा विकसित के ल्याबद्दल सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. आता अन्य विद्यापीठांनीही त्यांची ऑनलाइन परीक्षा सर्वसमावेशक के ली पाहिजे,’ असे युवराज झांजडे याने सांगितले.

अभिनव प्रयत्न

अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीद्वारे परीक्षा देण्याची सुविधा काही ठिकाणी उपलब्ध आहे. पण ऑनलाइन परीक्षेतही अ‍ॅक्सेसिबिलिटी सुविधा देण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रयत्न नक्कीच अभिनव आहे, असेही डॉ. काकडे म्हणाले.

अंध विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. ही प्रणाली आता विकसित करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सर्वसमावेशक झाल्या आहेत. – डॉ. नितीन करमळकर, कु लगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:21 am

Web Title: facilitate blind students to take online university exams akp 94
Next Stories
1 करोना प्रादुर्भावामुळे बालनाट्यांची टाळेबंदी
2 करोना प्रादुर्भावामुळे बालनाटय़ांची टाळेबंदी!
3 म्युकरमायकोसिसवरील उपचारांसंदर्भात पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय!
Just Now!
X