27 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये काकाच्या अश्लील मेसेजला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तिने थेट मोबाईल हातामध्ये देत त्यातील एक फोल्डर पाहण्यास सांगितले.

प्रातिनिधिक फोटो

पिंपरी-चिंचवड शहरात काकाच्या अश्लील मेसेजच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तीन महिन्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात नराधम काका विरोधात मृत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. हा सर्व प्रकार सप्टेंबर महिन्यात उजेडात आला असून राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत दीर हा औरंगाबाद येथे राहण्यास आहे. तिथे मृत मुलगी 2018 ला दहावीची परीक्षा झाल्यानंतर सुट्टीसाठी गेली होती. काही महिन्यानंतर म्हणजे सहा सप्टेंबर 2020 रोजी मृत मुलीच्या मित्राचा व्हाट्सऍप मेसेज फिर्यादी यांना आला की तुमच्या मुलीला तिचे काका अश्लील मेसेज करत आहेत.

तुम्ही पाहिले नाही का? तेव्हा  मुलीची आई तिच्या बेडरूममध्ये गेली. मुलीला यासंबंधी विचारले असता तिने थेट मोबाईल हातामध्ये देत त्यातील एक फोल्डर पाहण्यास सांगितले. ज्यात तिच्या चुलत्याने अश्लील मेसेज केले पाहायला मिळाले. तो पर्यंत मुलगी दुसऱ्या रूमच्या गॅलरीत गेली आणि तिथून उडी घेतली. हे सर्व पाहून फिर्यादी या बेशुद्ध झाल्या अस फिर्यादीत म्हटलं आहे.

घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच दरम्यान सात सप्टेंबर 2020 रोजी घरातील काम आवरत असताना फिर्यादी यांना मयत मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात काका हे अश्लील मेसेज करत असून जवळीक साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याचा उल्लेख होता. याच दरम्यान १७ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा दहा दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला होऊन तीन महिने उलटले असून  या सर्व धक्क्यातून सावरल्यानंतर शुक्रवारी भोसरी पोलीस ठाण्यात चुलत चुलत्या विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 7:00 pm

Web Title: fade up with uncles vulgar messages girl did suicide in pimpri kjp 91 dmp 82
Next Stories
1 पुणे : भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यात चोरी
2 छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर पवारसाहेब सारथी जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी – खासदार संभाजीराजे
3 पुण्यात शाळा तीन जानेवारीपर्यंत बंदच राहणार
Just Now!
X