21 February 2019

News Flash

कौटुंबिक वादातून पुतण्याने चुलतीचे घर पेटवले, दोघेही गंभीर जखमी

अग्निशमन दलाने दोघांना वाचवून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

प्रतिकात्मक छायाचित्र

कौटुंबिक वादातून चुलतीचे घर पुतण्याने जाळल्याचा गंभीर प्रकार काळेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील तापकीर नगर येथे घडला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेत चुलती आणि पुतण्या गंभीर भाजले आहेत. प्रीती संदीप सावंत आणि आरोपी नितीन सावंत अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रीती संदीप सावंत (वय ६०) आणि नितीन सावंत (वय २५, दोघे रा. तापकीर नगर, भैया वाडी) हे दोघे चुलती आणि पुतण्या आहेत. या दोघांत कौटुंबिक वाद आहे. याच वादातून मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुतण्या नितीनने चुलतीच्या घरात जाऊन रॉकेल ओतून घर पेटवून दिले. यात स्वतः नितीनही भाजला असून चुलती प्रीती सावंत देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. अग्निशमन दलाने माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी दोघांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना घडली तेव्हा घरात प्रीती सावंत यांची सून होती. त्या या घटनेतून बचावल्या आहेत. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.

First Published on February 14, 2018 7:59 am

Web Title: family dispute niece burned it aunts house in pimpri chinchwad both injured