News Flash

दिल्लीच्या आंदोलनाची केंद्रानं दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातून…; अजित नवलेंचा इशारा

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहंना देशापुढे झुकावंच लागणारच : नवले

“केंद्र सरकारने शेतकरी वर्गासाठी तयार केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरात पडसाद उमटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीत मागील २० दिवसापासून लाखोंच्या संख्येने शेतकरी ठिय्या मांडून बसले आहे. मात्र त्याकडे केंद्र सरकार लक्ष देताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा केंद्र सरकारला इशारा देते की येत्या तीन दिवसात यासंदर्भातील निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्रामधूनही आंदोलन सुरू होईल आणि या सर्वांची दखल केंद्र सरकारने घ्यावी,” अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देशापुढे झुकावे लागणारच, असंही ते यावेळी म्हणाले.

“केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात २० दिवसापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तेथील आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. हे आजवरच्या घटनेतून दिसून आले. या सरकारला हिंसा पाहिजे, शेतकर्‍यांचा सयम तुटला पाहिजे अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. या आंदोलनात खलिस्तानी, फुटीरतावादी सहभागी असल्याचे म्हटले जाते. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे,” असं नवले यावेळी म्हणाले. “या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेची काल बैठक झाली. यामध्ये राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की, येत्या तीन दिवसात केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रामधून आंदोलन सुरू केले जाईल आणि हे आंदोलन सर्वांनी दखल घेण्यासारखेच असेल. यापूर्वी देखील आम्ही नाशिक ते मुंबई पर्यंत पायी चालत आलो. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावीच लागली. त्यामुळे आमच्या आंदोलनापूर्वी केंद्राने दखल घ्यावी,” असा इशारा देखील त्यांनी दिला.

मागील २० दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींसाठी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पण तो पाठींबा बाहेरुन दिला असल्याने त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहनदेखील नवले यांनी यावेळी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 3:38 pm

Web Title: farmers law protest in delhi take decision in three days else will protest in maharashtra too ajit nawale akhil bhartiya kisan sabha svk 88 jud 87
Next Stories
1 अमानुष कृत्य : सात महिन्याच्या श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकले; घटनेत श्वानाचा मृत्यू
2 पुणे: मुलांचं उज्ज्वल भवितव्य आणि शिक्षणासाठी आई विकतेय सिग्नलवर डसबिन बॅग
3 ‘भामा-आसखेड’च्या पाण्यावरून नवा वाद
Just Now!
X