News Flash

शेतकरी आंदोलन : ही तर गैरजबाबदार पत्रकारिता – प्रकाश जावडेकर

चुकीच्या बातम्या, भ्रम, अफवा पसरवणे हे काम अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नसतं, असं देखील म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलन प्रकरणी अनेक पत्रकारांवरही देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विषयावर बोलताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज आपली भूमिका मांडली. पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५५ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशना प्रसंगी ते बोलत होते.

जावडेकर म्हणाले, “आम्ही लढाई लढली अभिव्यक्ती स्वातंत्र्यसाठी पण आता पाहात आहोत की मीडिया स्वतंत्र आहे, मी त्याचा मंत्री आहे. मीडियाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे पण ती जबाबदार हवी. जो शेतकरी अपघातात मृत्यू पावला, त्याचा विडिओ समोर आला त्यात सर्वांनी पाहिलं की ट्रॅक्टर उलटल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यावर प्रसिद्ध पत्रकार ट्विट करतात की तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला, ही स्वतंत्रता आहे? ही गैरजबाबदार पत्रकारिता आहे. यामुळे देशात अशांती पसरू शकते.”

तसचे, “अफवा पसरवणे हे स्वातंत्र्य नाही. भेदभाव तयार करणे, चुकीची बातमी करणे हे चुकीचे आहे. त्याची सत्यता पडताळा, मग, टीका टिपण्णी करा. सरकारचा विरोध करतो म्हणून आम्ही त्याचा विरोध करत नाहीत, त्याचे स्वागत आहे. चुकीच्या बातम्या, भ्रम,अफवा पसरवणे हे काम अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नसतं. असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.” असं देखील यावेळी जावडेकर यांनी बोलून दाखवलं.

तर, शेतकरी आंदोलन सुरू असताना परदेशातील काही सेलिब्रिटींनी याविषयी ट्विट करून भूमिका मांडली होती. या प्रकरणावर भाष्य करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा कटाचा भाग असल्याचा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 4:52 pm

Web Title: farmers movement so this is irresponsible journalism prakash javadekar msr 87 kjp 91
Next Stories
1 पुणे – एल्गार परिषदेला मी फारसं महत्व देत नाही – प्रकाश आंबेडकर
2 “आम्ही शरजील सोबत आहोत”; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा पुनरुच्चार
3 फडणवीस यांना स्वप्नेच बघावी लागतील!
Just Now!
X