News Flash

पती-पत्नीचा वाद, ५ महिन्याच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच केला खून

पत्नी गाढ झोपेत असताना पोटच्या लेकीचं नाक आणि तोंड दाबले; पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केला कबूल

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्याच्या बावधन परिसरात घरगुती वादातून एका जन्मदात्यानेच आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा  नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बापूराव जाधव (वय-३५) असे या आरोपीचे नाव  आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे.  त्यामुळे सर्वजण घरातच अ़डकलेले आहेत. दरम्यान, आरोपी बापूराव हा वाहनचालक असून तो ही गेल्या काही दिवसांपासून घरीच होता. अशातच त्याचे पत्नीसोबत वाद वाढले होते. दररोज होणाऱ्या वादाचा राग त्याने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीवर काढला. पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना त्याने चिमुकलीचा नाक आणि तोंड दाबून खून केला. घराच्या समोरील पटांगणात तिचा मृतदेह ठेवला आणि पुन्हा घरात येऊन पत्नीला झोपेतून उठवून मुलगी कुठे आहे? असा प्रश्न केला. आई आणि नराधम बाप हा चिमुकलीचा शोध घेत होते. बाप केवळ शोधण्याच नाटक करत होता. तेवढ्यात काही अंतरावर कुत्रे भुंकू लागले हे पाहून  चिमुकलीची आई धावत तिथे गेली , या ठिकाणी तिला आपली पोटची लेक  चिमुकली निपचित पडलेली आढळली हे पाहून त्या आईने हंबरडा फोडला.

आरोपी नराधम बापाने हिंजवडी पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस पगारे हे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:38 pm

Web Title: father kills 5 month old girl msr 87 kjp 91
Next Stories
1 “आज फिर दिल को हमने समझाया”, पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर मेधा कुलकर्णींचं ट्विट
2 Coronavirus : पुणे जिल्ह्यात चोवीस तासांत 9 मृत्यू, 111 नवे पॉझिटिव्ह
3 परप्रांतीय कामगार मूळ गावी रवाना
Just Now!
X