News Flash

किरकोळ बाजारातील परदेशी गुंतवणुकीबाबत पुनर्विचार व्हावा

या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा ठराव राज्यव्यापी व्यापारी परिषदेत करण्यात आला आहे.

राज्यव्यापी व्यापारी परिषदेत ठराव

किरकोळ व्यापारात शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीमुळे लाखो व्यापारी व्यवसायातून बाहेर फेकले जातील. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा ठराव राज्यव्यापी व्यापारी परिषदेत करण्यात आला आहे.

वस्तू व सेवा कर ई वे बिल, रोकडविरहित व्यवहारांसाठी बँक शुल्क, किरकोळ व्यापारातील परदेशी गुंतवणूक, आडत वसुली आणि नव्याने येऊ घातलेल्या बाजार शुल्क आकारणी अशा भुसार व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी दि पूना र्मचट्स चेंबर आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र) यांच्या वतीने राज्यव्यापी व्यापारी परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेला राज्यभरातून शंभर व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचेती, कीर्ती राणा, प्रभाकर विभुते, गजाननराव घुगे, उदय पेठे या वेळी उपस्थित होते.

वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे असल्याने किमान दोन वर्षे दंडात्मक कारवाई टाळावी, वस्तू व सेवा कर प्रणाली सुरू झाल्यानंतरही सेस, व्यवसायकर अद्यापही वसूल केला जात आहे. परिणामी वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही सेस वसुली बंद करावी, रोकडविरहित व्यवहारांवर बँकांकडून अनाठायी शुल्क आकारले जाते. कार्ड आणि पीओएस यंत्रावरील प्रत्येक व्यवहारासाठी बँकेकडून दोन ते तीन टक्के शुल्क आकारले जाते. त्यामुळे व्यापारी या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहेत, वस्तू व सेवा कर ई वे बिलबाबत अद्यापही अनभिज्ञता असून त्यातील तरतुदी व अर्ज भरणे किचकट आहे. तसेच बिलाची मर्यादा ५० हजार रुपयांऐवजी पाच लाखांपुढे असावी, अन्नधान्य, डाळी, मसाले, खाद्यतेल, तेलबिया हे घटक त्यांच्यावरील प्रक्रियेसहित वस्तू व सेवा करमुक्त असाव्यात, असे विविध ठराव परिषदेत मांडण्यात आल्याची माहिती चेंबरच्या वतीने देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 2:59 am

Web Title: fdi in retail market statewide business council
Next Stories
1 नवोन्मेष : ईवा सोल्युशन्स
2 हिंजवडीत इमारतीच्या १६व्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
3 केंद्रीय अर्थसंकल्प छाप सोडू शकलेला नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केली नाराजी
Just Now!
X