01 December 2020

News Flash

पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध

शहरात अनेक ठिकाणच्या सोसायट्यांना बेकायदा नळजोड देण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

बेकायदा नळजोड उघड होण्याची भीती

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी बसविण्यात येणाऱ्या पाणी मीटरला नागरिकांकडून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. बेकायदा नळजोड उघड होण्याची भीती, जास्त पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला कमी पाणी मिळेल आणि पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील अशी धास्ती, अशा कारणांमुळे हा विरोध होत असल्याचे पुढे येत आहे. नागरिकांकडून पाणी मीटर बसविण्यास नकार दिला जात असल्यामुळे पाणीपुरवठा विभागापुढील अडचणीतही वाढ झाली असून योजनेच्या मुख्य उद्देशालाही हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिके ने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत पाणी मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती आणि निवासी मिळकती मिळून तीन लाख पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पाणी मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी दोन वर्षात अवघे २३ हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. त्यातही पाणी मीटर चोरीला जाण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे योजनेचे काम रेंगाळले आहे.

शहरात अनेक ठिकाणच्या सोसायट्यांना बेकायदा नळजोड देण्यात आले आहेत. राजकीय वरदहस्ताने बेकायदा नळजोड बसविण्यात आले आहेत. तर क्षेत्रीय कार्यालयाकं डूनही काही ठिकाणी परस्पर नळजोड देण्यात आले आहेत. काही सोसायट्यांनीही त्यांना मंजूर असलेल्या नळजोड वाहिन्या परस्पर बदलल्या आहेत. पाणी मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे या दोन्ही बाबी पुढे येण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळेच पाणी मीटर बसविण्यास आलेल्या कं पनीच्या कर्मचाऱ्यांना पाणी मीटर बसविण्यास मज्जाव के ला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

सिंहगड रस्ता, धनकवडी, बालाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा नळजोड आढळून आले आहेत. ज्या ठिकाणी पाणी मीटर बसविण्यात आले आहेत, त्या ठिकाणी मीटर काढून टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणचे पाणी मीटर चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासन हतबल झाले असून पाणी मीटर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे..

तीन टप्प्यात कामे

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १ हजार ६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याबरोबरच जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती, पाणी मीटर बसविणे आणि साठवणूक टाक्यांची उभारणी करणे अशा तीन टप्प्यात ही कामे करण्यास सुरुवात झाली आहे.त्याअंतर्गत दोन वर्षात फक्त २३ हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. जलवाहिन्या टाकण्याची कामे मात्र संथ गतीने सुरू आहेत. नव्याने जलवाहिन्या टाकणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून खोदाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जेमतेम ५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:05 am

Web Title: fear exposing illegal plumbing water meter opposition from citizens akp 94
Next Stories
1 आफ्रिकेतील मालावी हापूस बाजारात
2 ‘पदवीधर’, ‘शिक्षक’चा निकाल पुणेकरांच्या हाती
3 अवकाळी पावसाचे सावट
Just Now!
X