24 October 2020

News Flash

ऑनलाइन शिक्षण, घरकाम करताना शिक्षिकांची कसरत

घरी पुरेसा वेळ देणे अशक्य; अडचणींचा सामना करण्याची वेळ

संग्रहित छायाचित्र

घरी पुरेसा वेळ देणे अशक्य; अडचणींचा सामना करण्याची वेळ

पुणे : सध्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षिका घरातूनच विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षण आणि घरकाम या दोन्ही जबाबदाऱ्या निभावण्याची कसरत शिक्षिकांना करावी लागत आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे यंदा जूनमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू न होता ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे शिक्षिका घरातूनच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिकवत आहेत. अध्यापनासाठी वर्ग, विषयानुसार पाठाची तयारी, त्यासाठी पूरक साहित्य तयार करावे लागते. त्याच वेळी घरातील स्वयंपाक, स्वच्छता आदी कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे शाळा आणि घरकाम या दोन्हीसाठी वेळ देताना शिक्षिकांची दमछाक होत आहे.

पुण्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे म्हणाल्या, की ऑनलाइन शाळा आणि घर हे दोन्ही करताना धावपळ होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्यासाठी पीपीटी तयार कराव्या लागत असल्याने त्यासाठी तयारी करावी लागते. शाळेच्या बैठका, चर्चा होत असतात. त्याशिवाय घरातील स्वयंपाक आणि बाकीची कामेही करावी लागतात. एकाच वेळी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तारांबळ होते. सर्वसाधारण काळात शाळेच्या वेळेत शाळेची कामे आणि बाकीचा वेळ घरी देणे शक्य होते. आता ऑनलाइन शिक्षणामुळे घरी पुरेसा वेळ देता येत नाही. सुरुवातीला ऑनलाइन शाळा आणि घरची कामे करणे हे दोन्ही जमवताना खूप धावपळ झाली. आता घरच्या कामांसाठी वेळापत्रकच तयार केले आहे. त्यानुसार घरी कामे करावी लागतात. पण या काळात कुटुंबीयांकडूनही सहकार्य मिळते. पण दोन्ही कामे करताना थोडी जास्त दगदग होते.

ऑनलाइन शिक्षण आणि घरकाम दोन्ही करणे अडचणीचे आहे. आधी घरातील सर्व कामे आवरून शाळेत जाता येत होते. त्याचे नियोजनही तसे केले होते. आता माझ्या चार वर्षांच्या लहान मुलीला सांभाळायला कु णीतरी असल्याशिवाय ऑनलाइन वर्ग घेता येत नाहीत. त्याशिवाय घरकामातही लक्ष घालावेच लागते. त्यामुळे एकाच वेळी घर सांभाळणे आणि ऑनलाइन वर्गासाठी तयारी करणे जरा कठीण जाते. माझ्या काही मैत्रिणींच्या घरात दोन मुले आहेत. त्यामुळे त्यांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागतो. पण शाळा सुरू होईपर्यंत या सगळ्याचा सामना करावा लागणार आहे. तशी मानसिक तयारी करून रोज ऑनलाइन वर्ग घेत आहे, असे नागपूरमधील शिक्षिका नूपुर खरे यांनी सांगितले.

एक तासाच्या ऑनलाइन वर्गासाठी दोन ते तीन तास नियोजन करावे लागते. विद्यार्थ्यांना शिकवलेले समजण्यासाठी पीपीटी तयार कराव्या लागतात. असे प्रत्येक वर्गासाठी करावे लागते. शाळेची कामे करताना घरकामे टाळू शकत नाही. त्यालाही वेळ द्यावा लागतो. त्याशिवाय लहान मुले असलेल्या शिक्षिकांना त्यांच्या मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. एकू णात ऑनलाइन वर्ग घेणे आणि घरकामे एकावेळी करणे कठीण होत आहे, असे खोपोलीतील शिक्षिका शिल्पा गोरे म्हणाल्या.

शिकवण्याची तळमळ

ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या सर्वच शिक्षिकांना या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन हा एकच मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज आणि शिकवण्याच्या तळमळीमुळे शिक्षिका शाळा आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या निभावत आहेत, असे काही शिक्षिकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:41 am

Web Title: female teacher tired of online education and housework zws 70
Next Stories
1 बारामतीत पुन्हा बिबटय़ाचा वावर
2 आयात बंद असल्याने खाद्यतेले महागली
3 शास्त्रीय गायकाशी गप्पांची संधी
Just Now!
X