News Flash

नाटक बिटक : नव्या संहितांचा महोत्सव

स्वप्नील चव्हाणनं लिहिलेलं ‘अध्यात तू सध्यात मी मध्यात म कुणी नाही’ हे नाटक अपूर्व साठेनं दिग्दर्शित केलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चिन्मय पाटणकर

मुंबईच्या ‘बिईंग असोसिएशन’ या नाटय़ संस्थेतर्फे ‘संहिता मंच’ हा नाटय़ महोत्सव २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान ज्योत्स्ना भोळे सभागृहात होत आहे. या महोत्सवातून नवीकोरी नाटकं रंगमंचावर येत आहेत.

नव्या काळाशी सुसंगत नाटय़ संहितेचा शोध घेऊन, त्यांना मंच निर्माण करून देण्याचं काम अभिनेत्री रसिका आगाशे आणि झिशान अयुब यांची ‘बिईंग असोसिएशन’ ही मुंबईताल नाटय़संस्था करत आहे. ‘संहिता मंच’ या नाटय़लेखन स्पर्धेच्या माध्यमातून सवरेत्कृष्ट नाटकांची निवड करून प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी संहिता मंच हा महोत्सव होत आहे. यंदा या महोत्सवात ‘राधेय’, ‘कबाब’, ‘अध्यात तू सध्यात मी मध्यात म कुणी नाही’, ‘रोमियो ज्युलिएट इन स्मार्ट सिटीज ऑफ कन्टेम्पररी इंडिया’ ही नाटकं सादर केली जाणार आहेत.

संहिता मंच नाटय़लेखन स्पर्धेतील हिंदी नाटकांसाठी यंदा रंगकर्मी रंजित कपूर, रत्ना पाठक शाह, अतुल तिवारी यांनी परीक्षण केलं. तर, मराठी नाटकांसाठी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, जयंत पवार आणि इरावती कर्णिक यांनी परीक्षण केलं. सवरेत्कृष्ट ठरलेली नाटकं रंगमंचावर येत आहेत. त्यांचा महोत्सव मुंबई आणि पुण्यासह यंदा भोपाळ, दिल्लीमध्येही होत आहे. पुण्यातील महोत्सवाचा प्रारंभ २६ ऑगस्टला ‘राधेय’ या नाटकानं होईल. अमित शर्मानं लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन रसिका आगाशेनं केलं आहे. हिंदी लेखक रामधारी सिंग दिनकर यांच्या ‘रश्मीरथी’ या गाजलेल्या कवितेवर आणि महाभारताच्या महायुद्धातील कर्णाच्या शेवटच्या दोन दिवसांवर हे नाटक बेतलेलं आहे. मी कोण, याचा कर्णानं घेतलेला शोध हे नाटकाचं आशयसूत्र आहे. २७ ऑगस्टला ‘कबाब’ हे राहुल राय लिखित आणि राजेश सिंग दिग्दर्शित नाटक सादर होईल. हव्यास, भ्रष्टाचार आणि भांडवलशाही ही या नाटकाची संकल्पना आहे.

स्वप्नील चव्हाणनं लिहिलेलं ‘अध्यात तू सध्यात मी मध्यात म कुणी नाही’ हे नाटक अपूर्व साठेनं दिग्दर्शित केलं आहे. या नाटकाचा प्रयोग २८ ऑगस्टला होईल, तर २९ ऑगस्टला ‘रोमियो ज्युलिएट इन स्मार्ट सिटीज ऑफ कन्टेम्पररी इंडिया’ या नाटकानं महोत्सवाचा समारोप होईल. स्वप्नील जैननं लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन सौरभ अनंतनं केलं आहे. सध्या स्मार्ट महानगरात राहणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट या नाटकात मांडण्यात आली आहे.

महोत्सवात नाटय़कृतींच्या सादरीकरणासह होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये अनिरुद्ध खुटवड, अश्विनी गिरी, प्रसाद वनारसे, अतुल पेठे, मकरंद साठे, आशुतोष पोतदार, मनस्विनी लता रवींद्र, अमोल पालेकर, धर्मकीर्ती सुमंत, आलोक राजवाडे सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:31 am

Web Title: festival of new drama play abn 97
Next Stories
1 पुणे : ऑगस्टमध्ये पावसानं केला विक्रम
2 शौक बडी चीज है ! विमानातून येऊन पुण्यात घरफोड्या करणाऱ्या हाय-फाय चोराला अटक
3 चंद्रकांत पाटील म्हणाले, हिंदुंच्या मताप्रमाणेच देश चालेल
Just Now!
X