News Flash

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान शॅम्पेनचे थेंब उडाल्याने अंगरक्षकाकडून ग्राहकाला मारहाण

पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडीमधील घटना

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान शॅम्पेनचे थेंब उडाल्याने अंगरक्षकाकडून ग्राहकाला मारहाण

पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथे वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करत असताना शॅम्पेन उडाल्याने ग्राहक आणि अंगरक्षकामध्ये हणामारी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एफएमएल या हॉटेलमध्ये शुभम कचरे आणि त्यांचे काही मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करताना कचरे आणि त्यांच्या मित्रांनी शॅम्पेनची बाटली उघडली. सेलिब्रेशनसाठी त्यांनी शॅम्पेनचे फवारे हवेत उडवले. यावेळी या शॅम्पेनचे काही थेंब हॉटेलमधील अंगरक्षकाच्या अंगावर उडाले. यावरुन कचरे आणि अंगरक्षक पांडुरंग खोते यांच्यात बाचाबाची झाली. पाहता पाहता बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या अंगरक्षकाने कचरे यांना प्लॅस्टीकच्या पाईपने मारहाण केली. यावेळेस कचरे यांच्या मित्रांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.

कचरे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी खोतेला अटक केली आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय जोगडंड करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 3:08 pm

Web Title: fight over birthday celebration kjp 91 scsg 91
Next Stories
1 पुण्याचं चित्र बदलणार; अजित पवार यांच्याकडून महत्त्वाच्या घोषणा
2 पुण्यातील ट्राफिकची चिंता मिटणार, राज्य सरकार उभारणार रिंग रोड
3 जनगणना पूर्वतयारीच्या कामाला आक्षेप!
Just Now!
X