News Flash

किरकोळ वादातून पोलिसांच्या मुलांमध्ये हाणामारी

एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांवर गुन्हा

(संग्रहित छायाचित्र)

एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांवर गुन्हा

पुणे : किरकोळ वादातून शिवाजीनगर पोलीस वसाहतीत एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दुबळे (वय १९, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश बर्डे, योगेश कदम, पप्पू धनवडे (तिघे रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबळेने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुबळे, बर्डे, कदम, धनवडे शिवाजीनगर पोलीस वसाहतीत राहायला आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी आणि महेश जाधव यांच्या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला होता. दुबळेने मध्यस्थी करून वाद सोडविला. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस वसाहतीच्या आवारातून तो मित्राबरोबर निघाला होता. आरोपी बर्डे, कदम, धनवडे यांनी दुबळेला गाठले आणि त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून तिघा आरोपींनी दुबळेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याचे डोके तसेच चेहऱ्यावर  तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:16 am

Web Title: fighting between police children over a minor dispute zws 70
Next Stories
1 खुल्या व्यायामशाळांसाठी साडेचार कोटींची उधळपट्टी
2 ‘एसआरए’ प्रकल्पांसाठी रहिवाशांच्या ७० टक्के संमतीची अट शिथिल
3 धरणांमध्ये १०.४२ टीएमसी पाणीसाठा
Just Now!
X