18 February 2020

News Flash

शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत जेवणासाठी मार्केटयार्डात हाणामारी

महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत दहा रुपयांत जेवण सुरू केले आहे.

संग्रहीत छायाचित्र

आजपासून पोलीस बंदोबस्त

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत जेवणासाठी झुंबड उडून हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी मार्केटयार्डात घडला. या पाश्र्वभूमीवर मंगळवारपासून (२८ जानेवारी) या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवला जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत दहा रुपयांत जेवण सुरू केले आहे. त्यानुसार पुणे शहरात सात आणि पिंपरी चिंचवडमध्ये चार ठिकाणी २६ जानेवारीपासून जेवण दिले जात आहे. पुण्यात सात ठिकाणांपैकी महात्मा फुले मंडई येथे संबंधित चालकाच्या अडचणीमुळे तेथील कें द्र तूर्त सुरू होऊ शकलेले नाही. इतर ठिकाणांपैकी मार्केटयार्ड येथील हॉटेल समाधान गाळा क्र. अकरा येथे जेवणासाठी सोमवारी एकच गर्दी झाली. थाळ्यांची मर्यादा आणि वेळ यामुळे हाणामारीचा प्रसंग उद्भवला.

याबाबत चालकाने पुरवठा विभागाला कळवून उपाययोजना करण्याबाबत मागणी केली. त्यानुसार शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी मंगळवारपासून पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी केली आहे. तसेच अन्य ठिकाणी देखील अशीच परिस्थिती उद्भवल्यास तेथेही पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मोरे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पंधराशे थाळ्या मिळत आहेत. पहिल्या दिवशी (२६ जानेवारी) एक हजार ११४, तर दुसऱ्या दिवशी (२७ जानेवारी) एक हजार ३०५ जणांनी योजनेचा लाभ घेतला.

First Published on January 28, 2020 4:21 am

Web Title: fighting in market yard for shiv bhojan thali zws 70
Next Stories
1 निर्भय व्हा, अन्यथा किंमत चुकवावी लागेल
2 सहा हजार २२९ कोटींचे स्वप्नरंजन
3 वीजनिर्मितीनंतर मुळशी धरणाचे पाणी पुण्याला पिण्यासाठी द्या!
Just Now!
X