News Flash

विस्तारित मेट्रोचा आर्थिक भार महापालिके वर

एकूण प्रकल्प खर्चापैकी केंद्र सरकारकडून दहा टक्के  निधी मिळणार आहे.

केंद्राकडून निधी देण्यात आखडता हात, सुधारित आर्थिक आराखड्याला मान्यता

पुणे : स्वारगेट-कात्रज विस्तारित भूमिगत मेट्रो मार्गिके चा आर्थिक भार महापालिके वर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पासाठीच्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून २० टक्क्यांऐवजी १० टक्के च हिस्सा केंद्राकडून दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिके ला अतिरिक्त ५३३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्याबाबतचा सुधारित आर्थिक आराखडा महापालिके कडून करण्यात आला असून त्याला स्थायी समितीनेही मंगळवारी मान्यता दिली.

महापालिके च्या मुख्य सभेने स्वारगेट-कात्रज विस्तारित भुयारी मार्गाला मार्च महिन्यात मान्यता दिली होती. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गिके चे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडूनच के ले जाणार आहे. त्यासाठी महापालिके च्या हिश्श्यापोटीची जमिनीची किं मत आणि पुनर्वसन खर्चासह २३३ कोटी ७५ लाख रुपये एवढा वाटा आहे. या विस्तारित मार्गाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठविण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या निधीचा हिस्सा केंद्राने २० टक्क्यांवरून १० टक्के  के ला आहे. केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही १० टक्के  निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने कमी के लेल्या निधीचा आर्थिक भार महापालिके ने उचलावा, अशी सूचना महापालिके ला करण्यात आली होती. मात्र प्रकल्पासाठी निधी कोठून आणायचा, हा प्रश्न असल्याने विस्तारित मार्ग अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामध्ये सुधारित आर्थिक आराखडा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

एकूण प्रकल्प खर्चापैकी केंद्र सरकारकडून दहा टक्के  निधी मिळणार आहे. तर राज्य सरकार आणि महापालिके कडून प्रत्येकी पंधरा टक्के  हिस्सा दिला जाणार आहे. उर्वरित ६० टक्के  निधी कर्जाद्वारे उपलब्ध के ला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ४ हजार २० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नव्या आर्थिक आराखड्यानुसार महापालिके ला आता ७३३ कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे तो मुख्य सभेच्या कार्यपत्रिके वर दाखल करण्यात आला आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर तो राज्य शासन आणि केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्रा सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

तीन स्थानके  प्रस्तावित

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिके चा विस्तार कात्रजपर्यंत करण्याची मागणी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी के ली होती. त्यानुसार महापालिके ने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना के ली होती. त्यासाठी महापालिके च्या अंदाजपत्रकात साठ लाख रुपयांची तरतूदही के ली होती. महामेट्रोकडून उन्नत आणि भुयारी अशा दोन मार्गिकांचा अहवाल आणि आर्थिक आराखडा करण्यात आला होता. उन्नत मार्गिका करणे अव्यवहार्य असल्याचे पुढे आल्यामुळे कात्रज-स्वारगेट भुयारी मार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मार्के ट यार्ड (गुलटेकडी), साईबाबानगर आणि कात्रज अशी तीन स्थानके  या मार्गिके मध्ये प्रस्तावित आहेत.

मार्गिका विस्ताराचे नियोजन

कात्रज-स्वारगेट विस्तारित मार्गिके बरोबरच सिंहगड रस्ता ते पुणे कॅ न्टोन्मेंट, शिवाजीनगर ते हडपसर, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, वारजे ते स्वारगेट या मार्गांवर मेट्रो मार्गिके चा विस्तार के ला जाणार आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता शहराच्या चारही बाजूला प्रत्येकी ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारित करण्याचे नियोजित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:26 am

Web Title: financial burden of the expanded metro falls on the municipal corporation akp 94
Next Stories
1 करोना चाचणीनंतर वृद्धाश्रमात प्रवेश
2 म्युकोरमायकोसिसच्या भीतीने पुण्यात रेमडेसिविरला अत्यल्प मागणी
3 पिंपरीत करोनास्थिती सुधारली
Just Now!
X