पुणे : विद्युत उपकरण निर्मितीतील फिनोलेक्स केबल्सने घरगुती तसेच औद्योगिक स्विचगीअर्स बाजारपेठेतील अस्तित्व आणखी मजबूत करताना, एमसीसीबीची निर्मिती सुरू केली आहे. ६३ ते ८०० अ‍ॅम्पीअर अशा व्यापक श्रेणीत उपलब्ध या उत्पादनाची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आली आहे.

एमसीसीबीच्या प्रस्तुतीतून फिनोलेक्स केबल्सने २,००० कोटी रुपयांच्या सशक्त औद्योगिक स्विचगीअरच्या बाजारपेठेत शिरकाव केला असल्याते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया यांनी सांगितले. विद्युत उपकरणांच्या क्षेत्रात फिनोलेक्स केबल्स टप्प्याटप्प्याने अस्तित्व विस्तारत असून, तिच्या इलेक्ट्रिकल स्विचेस, दिवे, पंखे आणि वॉटर हीटर उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे छाब्रिया यांनी स्पष्ट केले.