05 March 2021

News Flash

माहिती अधिकारी कार्यकर्त्यांला धमकावल्याबद्दल नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा

काँग्रेसचे नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याविरुद्ध माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांला धमकाविल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

| April 10, 2015 03:03 am

पुणे महापालिकेच्या औंध प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याविरुद्ध माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांला धमकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विजय कुंभार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील बॉडीगेट परिसरात विजय कुंभार यांच्या अनुपमा सहकारी गृहरचना संस्थेच्या सर्वे क्रमांक दोनमधील प्लॉट क्रमांक दोनमध्ये अनेकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अतिक्रमण केले आहे. त्याच सर्वे क्रमांकामध्ये सुरू असलेल्या बांधकामाबाबत शंका आल्याने विजय कुंभार हे कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे यांच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेले होते. त्या वेळी नगरसेवक कैलास गायकवाड तेथे आले. त्यांनी कुंभार यांना ‘माझ्या प्रकल्पामध्ये आडवा येतो का. तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली. तसेच अरेरावीची भाषा वापरल्याचे कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 3:03 am

Web Title: fir against corporator kailas gaikwad
Next Stories
1 देशातील आजारी कंपन्यांसाठी केंद्राचे लवकरच धोरण – खासदार अमर साबळे
2 पिंपरीत अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार
3 रेल्वे आरक्षणाच्या नव्या नियमामुळे विद्यार्थी अडचणीत!
Just Now!
X