News Flash

करोना उपचारासाठी अधिक पैसे घेणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा

संदर्भात फिर्यादीने वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली

पिंपरी : करोना उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे वसूल करणाऱ्या चाकण येथील क्रिटिकेअर रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात चाकण येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदा गणपत ढवळे (वय ५८) यांनी शनिवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. सीमा गवळी आणि डॉ. घाटकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिटिकेअर रुग्णालयात करोना बाधित रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाइकाकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीचे पैसे घेतले. या संदर्भात फिर्यादीने वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. अधीक्षकांनी रुग्णालयाच्या संचालकांना रुग्णाच्या उपचारासाठी बेकायदेशीरपणे वसूल केलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. परंतु रुग्णालय प्रशासनाने ती परत केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 4:12 am

Web Title: fir against doctor who charges more for corona treatment zws 70
Next Stories
1 रेमडेसिविरची चढय़ा भावाने विक्री करणाऱ्या एकास अटक
2 झटपट लसीकरणासाठी ‘को-विन’च्या प्रारूपाचा वापर
3 ‘केंद्राचे लसीकरण धोरण चुकीचे’
Just Now!
X