News Flash

मनसेचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

म. न. से. नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी त्यांच्याच पक्षातील नगरसेविकेच्या वडिलांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

| May 17, 2015 03:30 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी त्यांच्याच पक्षातील नगरसेविकेच्या वडिलांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नगरसेविका अर्चना रमेश कांबळे (वय ३०, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ढोरे यांच्या विरोधात मारहाण, धमकी देणे या बरोबरच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या बोपोडी येथील प्रभागातून दोघेही मनसेकडून निवडून आले आहेत. शुक्रवारी बोपोडी येथील कोठीत एक व्यक्ती कामासाठी आली होता. त्याला रमेश कांबळे यांनी इकडे कशाला आला, अशी विचारणा केली होती. त्याबाबत ढोरे यांनी कांबळे यांच्याकडे विचारणा करीत मारहाण केली होती. त्यानंतर कांबळे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अर्चना यांनी ढोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार अर्चना कांबळे यांनी दिली आहे. त्यावरून खडकी पोलीस ठाण्यात ढोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:30 am

Web Title: fir against mns corporator prakash dhore
Next Stories
1 ‘देशाच्या प्रगतीसाठी व्यवस्थाकेंद्रित यंत्रणा हवी’
2 Nayana Pujari case: नयना पुजारी खून खटल्यातील पलायन करणाऱ्या योगेश राऊतला सहा वर्षे सक्तमजुरी
3 ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाची अमृतमहोत्सवपूर्ती
Just Now!
X