पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गरोदर महिलेचा बेकायदापणे गर्भपात केल्याप्रकरणी महिला डॉक्टराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ आठवडे ४ दिवसांची गरोदर असलेल्या एका महिलेचा २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. गर्भपात करताना संबंधित महिलेला त्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याचबरोबर संबंधित अर्भकाच्या जीवितास कोणताही धोका नव्हता. तरीही बेकायदापणे गर्भपात केल्याबद्दल पीडित महिलेच्या तक्रारीवरून ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी अॅक्ट १९७१’च्या कलम ३ अन्वये डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबाग पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.