पुण्यातील कोथरूड येथील कचरा डेपोला आग लागल्याची घटना घडली असून घटनास्थळी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील कचरा डेपोला आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळाल्यानंतर तातडीने तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहे. कचरा डेपोला आग मोठ्या प्रमाणावर लागली असून कचरा डेपोच्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.