पुण्याच्या नवी पेठ भागातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या अनुदत्त इमारतीला आज (शुक्रवारी) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या आगीत जवळपास २५ वाहने जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र आगी लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(संग्रहित छायाचित्र)