News Flash

पुण्यात इमारतीला भीषण आग, चौथा मजला जळून खाक

तासभराच्या परिश्रमानंतर आग विझविण्यात आली.

Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news ,
सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

बाणेर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या कपिल क्लासिक या इमारतीत अचानक लागलेल्या आगीमुळे या इमारतीचा चौथा मजला पूर्णपणे जळून खाक झाला असून तिसऱ्या मजल्याचा देखील काही भाग जळाला आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील कपिल क्लासिक हे चार मजली कर्मशियल कॉम्पलेक्स आहे. या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यालय असून याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तासभराच्या परिश्रमानंतर आग विझविण्यात आली. या आगीत चौथा मजला आगीत पूर्णपणे जळून खाक झाला असून त्या मजल्यावरील संगणक आणि कार्यालयीन वस्तू जळाले आहेत. आगीच्या वेळी ऑफिसमध्ये कोणते कामकाज सुरू होते का, हे अद्याप समजू शकले नाही, अशी माहितीही अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. या आगीची झळ तिसऱ्या मजल्यावरील काही कार्यालयांनाही बसली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 4:19 pm

Web Title: fire at punes baner area fourth floor fully burns
Next Stories
1 ‘गीतरामायण’ अयोध्या नगरीत निनादणार
2 पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या सीमा सावळे बिनविरोध
3 शहरबात पुणे : मुंढे यांच्या निमित्ताने पीएमपी पुन्हा चर्चेत
Just Now!
X