News Flash

पुण्यात मसाल्याच्या कारखान्याला आग

गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथील ओंकार नगर येथे मसाला तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये आग लागली.

पुण्यातील बिबवेवाडी येथील ओंकार नगर येथे मसाला तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये आग लागली. या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारनगर येथे मसाला बनवणाऱ्या कारखान्यात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीत मसाला तयार करण्याच्या मशिनरी जळून गेल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:50 pm

Web Title: fire at punes bibewadis masala factory
Next Stories
1 पुणे- उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा तरुणाचा प्रयत्न
2 राममंदिरासाठी वायदा नको; कायदा हवा
3 नव्या आर्थिक वर्षांत करवाढीची शक्यता
Just Now!
X