18 April 2019

News Flash

थेऊर येथील राइज अँड शाइन कंपनीला भीषण आग

ही आग का लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

पुण्यातील थेऊर येथील राइज अँड शाइन कंपनीला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलातर्फे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी का लागली ते समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राइज अँड शाइन बायोटेक कंपनीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दोन तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे अग्निशमन दलाच्या तीन आणि पीएमआरडीए च्या तीन टँकरच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेक .ही आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.तसेच या घटनेत कंपनीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.अशी माहिती देण्यात आली आहे. आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहण्यास मिळत आहेत.

 

First Published on September 14, 2018 12:13 pm

Web Title: fire at rise and shine company in theur pune