पुण्यातील जहांगीर रुग्णालयासमोरील सोहराब हॉलमधील क्रॉसवर्ड लायब्ररीमध्ये लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मात्र, इमारतीतून अजूनही धूर निघत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे काम अद्याप संपुष्टात आलेले नाही. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. त्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. काल रात्री लागलेली ही आग पहाटे नियंत्रणात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पुन्हा आगीचा भडका उडाला. आग विझवण्यासाठी १२ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. आतापर्यंत तीन जणांना वाचविण्यात यश आले आहे.  या आगीत येथील हजारो पुस्तके जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे इमारतीच्या काही भागांना तडे गेल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.

(संग्रहित छायाचित्र)