पिंपरी-चिंचवड : चिखली-मोशी रोडवर असलेल्या एम. के. ट्रेडर्स या लाकडाच्या वखारीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली. सध्या सहा बंब आणि दोन खाजगी टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणले असून कुलिंगचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चिखलीतील चौधरी वजन काटा याच्या पाठीमागे असलेल्या एम. के. ट्रेडर्स या वखारीच्या गोडाऊनला रविवारी पहाटे मोठी आग लागली. या गोडाऊनमध्ये लाकडं होती, त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर काही तासातच वखारीतील लाकडं जाळून खाक झाली, या लाकडांचा आता कोळसा झाला आहे.
पहाटे पावणे पाच वाजता अग्निशामन दलाला आग लागल्याची वर्दी आली. त्यानुसार पिंपरी येथील ३ बंब, प्राधिकरण, भोसरी आणि तळवडे येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना झाले होते. तसेच दोन खाजगी टँकर देखील होते. आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. मिसाल अहमद खान (वय ३८) यांच्या मालकीचे एम. के. ट्रेडर्स आहे. या आगीत ऐकून १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 11:56 am