पुण्यातील नांदेड फाटा येथील एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड फाटा येथे केकवरील शोभेची दारु तयार करण्याची एक कंपनी आहे. सकाळच्या सुमारास कंपनीमध्ये १२ ते १५ कामगार होते. सव्वा दहाच्या सुमारास काम सुरू असताना, अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. कामगारांना काही समजण्याच्या आत कंपनीमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे सर्व कामगार बाहेर पळत सुटले. मात्र दोन कामगार आतमध्ये अडकून पडले.

nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार
in dhule Four Year Old Girl came to under truck wheel and died driver Attempts to destroy evidence and dead body
धुळे : बालिकेच्या मृत्युनंतर नाल्यात प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

या सर्व घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी काही मिनिटात दाखल झाले. आतमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तर या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,