02 December 2020

News Flash

कात्रज येथील गोडाऊनला आग, ५० दुचाक्या जळून खाक

या आगीचे कारण अद्याप समजले नाही

सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून ५० दुचाक्या जळून खाक झाल्या आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिली.
अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कात्रजमधील मांगडेवाडीत हिंदुजा फायनान्स कंपनीचे विजया एंटरप्रायझेस नावाचे गोडाऊन आहे. त्या ठिकाणी हप्ते न भरलेल्या दुचाकी जप्त करून त्या ठिकाणी ठेवल्या जातात. आज सायंकाळच्या सुमारास अचानक गोडाऊन ला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या काही वेळामध्ये दाखल झाल्या. मात्र तोवर ही आग मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे बाजूच्या काही दुकानाचे ही नुकसान झाले असून या गोडाऊन मधील तब्बल ५० दुचाकी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 10:48 pm

Web Title: fire in warehouse katraj 30 lakh rupees worth vehicles damaged
Next Stories
1 पत्नी, सासू-सासऱ्यांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; निगडीतील घटना
2 थंडाव्याचा यशस्वी घरगुती प्रयोग
3 नागरी सेवेत येऊन अपेक्षित बदल घडवा!
Just Now!
X