पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयात पुन्हा एकदा आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. मागील आठवड्यातही येथे आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीत अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असल्याची शक्यता आहे. वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आरटीओतील एका इमारतीला आग लागली. आग मोठ्याप्रमाणात पसरली होती. पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागण्याची शक्यता असून या घटनेमध्ये कागदपत्रे देखील जळाले आहेत. मागील आठवड्यात देखील या कार्यालयात सकाळच्या सुमारास आग लागली होती