News Flash

दहावीत पास झालेल्या मुलासाठी मिठाई आणायला गेलेल्या महिलेवर गोळीबार

शीतल सिकंदर या गांधीनगर झोपडपट्टीत राहत असून मुलगा दहावीत पास झाला म्हणून त्या शनिवारी दुपारी एचए कॉलनीतील कॅन्टीनमध्ये मिठाई आणायला गेल्या होत्या.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी शीतल यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र नेम चुकल्याने शीतल थोडक्यात बचावल्या.

पिंपरीतील एचए कॉलनीत एका महिलेवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. शीतल सिकंदर (३५ वर्षे) असे या महिलेचे नाव असून हल्लेखोरांचा नेम चुकल्याने त्या गोळीबारातून बचावल्या आहेत.

शीतल सिकंदर या गांधीनगर झोपडपट्टीत राहत असून मुलगा दहावीत पास झाला म्हणून त्या शनिवारी दुपारी एचए कॉलनीतील कॅन्टीनमध्ये मिठाई आणायला गेल्या होत्या. शीतल यांच्यासोबत आणखी एक महिला होती. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी शीतल यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र नेम चुकल्याने शीतल थोडक्यात बचावल्या. गोळीबारानंतर शीतल यांनी घटनास्थळाजवळील एका घरात आश्रय घेतल्याने हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 3:32 pm

Web Title: firing on 35 year old woman in pimpri probe begin
Next Stories
1 आजीने भंगार विकून नातवाला शिकवले; पिंपरीच्या तुषारला दहावीत ७० टक्के
2 Maharashtra SSC 10th Result 2018 : रुग्णालयातून दहावीची परीक्षा दिली!
3 दहावीचा पुणे विभागाचा निकाल ९२.८ टक्के
Just Now!
X