पुणे शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये विशेषतः व्यापारी वर्गाला सर्वाधिक फटका बसला असून अगोदरचा करोनामुळे सर्व व्यापार ठप्प होता. आता कुठे दुकाने सुरू झाली असताना. या पावसाने प्रत्येक दुकानदारचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून अगोदर करोनामुळे व्यवसाय मारला आता या पावसाने अशी भावना या दुकानदारांच्या मनात आहे. आम्ही जगायचं तरी कसं? असं हे व्यापारी आता विचारत आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये अनेक सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहे. रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते की, एवढा जोरात पाऊस आहे की, आपल्या दुकानातील मालाची अवस्था काय झाली असेल या चिंतेत होते. बाहेर पडावे तर पाऊस आणि घरात बसलो. तर दुकानाचे काय झाले असेल, या विचारत असताना. सकाळी पावसाचा जोर कमी होताच, अनेक दुकानदारांनी दुकानाकडे धाव घेऊन, पाहणी केली असता. रस्त्यावर पाणीच पाणी आणि चिखलाचा खच पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. यामुळे दुकानातील मालाची काय अवस्था झाली असणार याची जाणीव प्रत्येकाला आली होती.

दुकानं उघडताच पाण्याची लाट सरतशी बाहेर पडली. त्यानंतर दुकानाच्या मालकासह, कामगार बकेटने बाहेर पाणी काढताना. अनेक ठिकाणी चित्र पाण्यास मिळेल. अशीच परिस्थिती शहरातील सततचा वर्दळीचा भाग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर आहे. तेथील दुकानांमध्ये किमान दोन फूट पाणी साचले होते. दुकानातील पाणी काढताना अनेक दुकानदारांची दमछाक झाली होती. तर या पावसाच्या पाण्याने प्रत्येक दुकानदराचे सरासरी दोन लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले. तसेच अगोदरच मार्च महिन्या पासून सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. केव्हा दुकाने सुरू होतील आणि पूर्वीसारखा व्यापार सुरळीत होईल. या चिंतेत आम्ही सर्व व्यापारी होते. त्याच दरम्यान सरकारमार्फत दुकानं सुरू करण्यास परवानगी देऊन, काही दिवस झाले होते. जवळपास १५ ते २० टक्के प्रमाणात व्यापार सुरू झाला होता. नागरिक खरेदीसाठी येत होते. मात्र काल रात्रीच्या पावसाने दुकानातील मालाचे खूप नुकसान झाले असून त्यामुळे अगोदर करोना आजाराच्या भीतीने अर्धमेलो झालो होतो. आता या पावसामुळे व्यापार मेल्यासारखा झाल्याची भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.